Neet 2024 Exam Date Declared नीट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Spread the love

नीट 2024 परीक्षा वेळापत्रक, अर्ज करण्याची पध्दत, पात्रता, परीक्षा फी वाचा सविस्तर : Neet 2024 Exam Date, Application Procedure, Eligibility and Exam Fee 

Neet 2024  या परीक्षेची तारीख एनटीए ने सन 2024 साठी नीट परीक्षेची तारीख जाहीर केलेली आहे.  Neet 2024 ची परीक्षा ही 5 मे 2024 रोजी होणार आहे.  याबाबतची अधिक माहिती पाहुया.

Neet 2024 Exam Announcement :

Neet 2024 Exam  ही नुकतीच NTA ची परीक्षा आयोजित करणा-या संस्थेने अधिकृतपणे जाहीर केली आहे.  जी 5 मे 2024 रोजी होणार आहे.  जे विदयार्थी वैदयकीय क्षेत्रात आपले करिअर घडवू पाहतात अशा विदयार्थी व विदयार्थीनींसाठी भारतीय सर्वोच्च वैदयकीय महाविदयालयातून एमबीबीएस, बीडीएस, नर्सिंग, बीएचएमएस आणि बीएएमएस यासारखे विविध अभ्यासक्रम पुर्ण करण्याचा हा एकच मार्ग आहे.

Date Declare for Neet 2024 Exam :

Neet 2024 ही  इंग्रजी, हिंदी आणि उर्वरीत 13 प्रादेशिक भाषांमध्ये पेन आणि पेपर या पध्दतीने आयोजित केली जाते.  Neet 2024  ची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही मार्च 2024 च्या शेवटच्या आठवडयात त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर  Online Application सुरू होईल.  Neet 2024  परीक्षेची तारीखेची वाट हे विदयार्थी अनेक दिवसापासुन पाहात असतात त्यातील हा एक महत्वाचा टप्पा आहे.  लाखो उमेदवार त्यांचे ज्ञान आणि कौशल्य आजमवण्यासाठी एकत्र येतात आणि वैदयकीय क्षेत्राचे भवितव्य पुढे घेउन जाण्याला यशस्वी प्रारंभ करतात त्याची तारीखच 5 मे 2024 होय.

Who conduct Neet 2024 Exam

Neet 2024  परीक्षेची ब-याच जणांना याबाबत कुतुहल आहे याचे कारण म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे ही परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी दिलेली आहे.  नॅशनल टेस्ट एजन्सीने अधिकृतपणे नीट 2024 परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर केली आहे.  ती 5 मे 2024 रोजी होणार असुन त्याबाबत एनटीए च्या अधिकृत संकेतस्थळावर जाउन पुन्हा तपासुन पाहावे.  दरवर्षी अंदाजे 15 लाखांहुन जास्त विदयार्थी नीट परीक्षेसाठी प्रविष्ठ होतात सर्वात कठीण मानली जाणारी अशी ही भारतातील वैदयकीय परीक्षांपैकी एक आहे. 

नीट परीक्षा 2024 ही नॅशनल टेस्ट एजन्सी एनटीए व्दारे एमबीबीएस, बीडीएस, आयुर्वेदीक तसेच व्हेटरनरी कोर्सेसच्या प्रवेशासाठी घेतली जाते.  नीट 2024 अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारांनी लवकरात लवकरात आपला अर्ज पुर्ण करावा त्याबाबत वेळापत्रक दिले आहे.

Exam timetable of Neet 2024 :

ज्या उमेदवारांना नीट 2024 करिता आवेदनपत्र भरावयाचे आहे त्यांनी आपले सर्व कागदपत्र आत्तापासुनच तयार ठेवावेत कारण मार्च 2024 मध्ये जी रजिष्ट्रेशन विडो ओपन होणार आहे.  त्यामध्ये जी कागदपत्रे लागतात ती आत्तापासुनच तयार ठेवावेत म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही.

  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा महिना  : मार्च 2024
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख अंदाजे : एप्रिल 2024
  • ऑनलाईन अर्ज फी भरण्याची तारीख : एप्रिल 2024
  • अर्ज दुरूस्ती : एप्रिल 2024
  • ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षेचे हॉलतिकीट : एप्रिल 2024 च्या शेवटच्या आठवडयात
  • नीट 2024 परीक्षा तारीख : 5 मे 2024
  • नीट 2024 परीक्षा निकाल : जुन 2024 च्या पहिल्या आठवडयात
  • नीट 2024 पुढील प्रक्रिया : जुन 2024 च्या दुस-या आठवडयापासुन

Detail Information Regarding Neet 2024 Exam, Time Details Etc. :

  • नीट परीक्षा 2024 तारीख : 5 मे 2024 रविवार
  • नीट परीक्षा 2024 परीक्षेचा वेळ : दु. 2.00 ते 5.20 पर्यंत एकुण 3 तास 20 मिनिटे
  • परीक्षा हॉलमध्ये जाण्याची वेळ : दु. 1 वाजुन 15 मिनिटे
  • परीक्षा हॉलमध्ये जाण्याची शेवटची वेळ : दु. 1 वाजुन 30 मिनिटे
  • परीक्षा पेपर वाटण्याची वेळ : दु. 1 वाजुन 45 मिनिटे
  • पेपरवरील तपशील लिहिण्याची वेळ : दु. 1 वाजुन 50 मिनिटे
  • प्रत्यक्ष परीक्षा सुरूवात : दु. 2 वाजता
  • परीक्षा संपण्याची वेळ : दु. 5. 20 वाजता

Steps for Filling Neet 2024 Exam Form :

  • उमेदवाराने आपले सर्व कागदपत्र प्रथम गोळा करावेत जसे की, शैक्षणिक कागदपत्रे, फोटो, सही, ओळखपत्र इ.
  • नीट 2024 च्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • Apply Online  या टॅबवर क्लिक करा.
  • त्यामधील आवश्यक ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक रजिर्ष्टेशन आयडी आणि पासवर्ड मिळेल.
  • कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्जाचे पेमेंट करा.
  • अर्ज सबमिट करा.

Spread the love

Leave a Comment