Maharashtra Stamp Duty Abhay Yojana 2024

Spread the love

मुद्रांक सवलत अभय योजना स्वरूप, (Maharashtra Stamp Duty Abhay Yojana 2024) कोणत्या दस्तांना सवलत, तपशिलवार संपुर्ण माहिती

राज्य सरकारने महाराष्ट्र मुद्रांक शल्क अभय योजना राबविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.  राज्याच्या मुद्रांक व शुल्क विभागाने काही बांधकामावरील चुकीचे मुद्रांक भरलेल्या आणि कमी मुद्रांक भरणा-यांना मुद्रांत अभय योजना लागु करण्यात आलेली आहे.  निवासी, अनिवासी तसेच औदयोगिक वापराच्या प्रयोजनासाठी केलेले सर्व व्यवहार, विक्री करारपत्रे, भाडेपटटे, हेही लागू आहेत.  या अभया योजनेअंतर्गत एक रूपयापासुन ते 25 कोटीपेक्षाही जास्त रूपयांच्या रक्कमेवर 25 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे.  तसेच आकारण्यात आलेल्या दंडावरही यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे.  त्यामुळे राज्याच्या तिजोरीत सुमारे दोन ते अडीच हजार कोटी रूपयांची जादा भर पडणार आहे.

What is Maharashtra Stamp Duty Abhay Yojana ? अभय योजना नेमकी आहे काय : 

सन 1980 ते सन 2020 या काळात सुमारे दोन लाख 34 हजार प्रकरणात मुद्रांक शुल्क कमी भरण्यात आल्याचे महालेखाकार कार्यालय आणि नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने केलेल्या तपासणीमध्ये आढळुन आले.  याची पुर्नवसुली आजपर्यंत न झाल्याने अखेर अभय योजना राबविण्याचा प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने या वर्षीच्या जुलै महिन्यात राज्य सरकारकडे दिला होता त्या अनुसार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अभय योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.  या योजनेतुन सरकारला सुमारे दोन हजार कोटी रूपये मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Steps to Improve Maharashtra Stamp Duty Abhay Yojana : योजनेचे करण्यात आलेले टप्पेः 

योजनेचा पहिला टप्पा : दि. 01 डिसेंबर 2023 ते दि. 31 डिसेंबर 2024
योजनेचा दुसरा टप्पा : दित्र 01 फेब्रुवारी 2024 ते दि. 31 मार्च 2024

Details about Maharashtra Stamp Duty Abhay Yojana : योजनेचे स्वरूप : 

दि. 01 जानेवारी 1980 ते दि. 31 डिसेंबर 2000 या दरम्यान नोंदणी करण्यात आलेल्या दस्तांसाठी पहिल्या टप्प्यात एक लाख रूपयांपर्यत मुद्रांक शुल्कासह दंडात 100 टक्के सवलत दिली आहे.  एक लाखांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क असेल तर 50 टक्के सवलत तर दंडात 100 टक्के सवलत देण्यात आलेली आहे.  तसेच योजनेच्या दुस-या टप्प्यात एक लाखापर्यंत मुद्रांक शुल्कासह दंडाच्या रकमेतही प्रत्येकी 80 टक्के सवलत देण्यात आली आहे.  तसेच एक लाखांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्कावर 40 टक्के सवलत तर दंडामध्ये 70 टक्के सवलत देण्यात आली आहे.

दि.1जानेवारी 2001 ते दि. 31 डिसेंबर 2020 यांच्या दरम्यान नोंदणी केलेल्या दस्तांसाठी 25 कोटी रूपयांपर्यंतच्या मुद्रांक शुल्कासाठी 25 टक्के सवलत देण्यात आली आहे तर दंडाची रक्कम 25 लाखांपेक्षा कमी असल्यास 90 टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच दंडाची रक्कम 25 लाखांपेक्षा जास्त असल्यास तेवढा दंड घेतला जाईल परंतु त्यावरील राहिलेली रक्कम सवलतीत माफ केली जाईल.  25 कोटी रूपयांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्कावर 20 टक्के सवलत दिली असुन एक कोटी रूपयांचा दंड असेल तर तो वसुल केला जाईल. 

तसेच योजनेच्या दुस-या टप्प्यात 25 कोटी रूपयांपर्यंतच्या मुद्रांक शुल्क 20 टक्के तर दंडाची रककम 50 लाख रूपयांपेक्षा कमी असल्यास 80 टक्के सवलत देण्यात येईल.  25 कोटी रूपयांपेक्षा अधिक मुद्रांक असतील तर 10 टक्के सवलत दिली जाईल तर दोन कोटी दंड असल्यास तो वसुल केला जाईल.जिल्हा मुदांक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय या दोन्ही कार्यालयामार्फत ही योजना राबविली जाणार आहे.

सवलत मिळणा-या दस्तांचा प्रकार : Maharashtra Stamp Duty Abhay Yojana

निवासी, अनिवासी, औदयोगिक, अकृषिक वापराच्या प्रयोजनार्थ अभिहस्तांतरणपत्र, विक्री, भाडेपटटा, विक्री प्रमाणपत्र, बक्षीसपत्र अथवा करारनामा यांच्याशी संबंधित असलेला दस्त तसेच हक्कविलेख निक्षेप, हडप, तारण किंवा तारणगहाण यासंबंधित असणारा करारनामा, करारनामा किंवा त्याचा अभिलेख, कराराचे ज्ञापन, निवासी वापराच्या प्रयोजनासाठी स्थावर मालमत्तेच्या भाडेदारीच्या हस्तांतरण करण्याशी संबंधित असतील तर, म्हाडा, त्याची विभागीय मंडळ, सिडको, तसेच मान्यताप्राप्त एसआरए योजनेअंतर्गत पुनर्वसनाच्या प्रयोजनार्थ झोपडीधारकांना निवासी किंवा अनिवासी घराचे अभिहस्तांतरण पत्र, तसेच पुनर्विकास करण्याशी संबंधित असणारा कोणत्याही प्रकारचा करारनामा, अभिहस्तांतरणपत्र किंवा करार, कंपन्याचे एकत्रीकरण, विलीनीकरण, विभाजन, व्यवस्था किंवा पुनर्रचना करणेबाबतचा कोणताही दस्त यामध्ये मोडतील. तसेच सरकारी जमिनीवरील नोंदणीकृत सहकारी सोसायटयांनी किंवा म्हाडा तसेच सिडको, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांनी मान्यता दिलेल्या नियोजन प्राधिकरणांनी निवासी, अनिवासी घरांच्या दस्तांसाठी.

Seperate Department For Abhay Yojana : अभय योजनेसाठी स्वतंत्र कक्ष 

मुद्रांक शुल्क अभय योजनेसाठी अर्जदारांना संबंधित जिल्हयाच्या मुद्रांक जिल्हाधिकारी किंया दुयम निबंधकाच्या कार्यालयात समक्ष किंवा ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येउ शकेल.  त्याकरिता अर्जाचा नमुना www.igrmaharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व सह जिल्हा निबंधक तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात याकरिता विशेज्ञ कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.  या योजनेची माहिती या विशेष कक्षात उपलब्ध करण्यात आली आहे.  अभय योजनेबाबत काही तक्रार असल्यास संबंधित जिल्हयाचे सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाचे कॉल सेंटर क्रमांक 8888007777 यावर संपर्क साधणे आवश्यक आहे

राज्य सरकारने जाहीर केलेल्या या मुद्रांक शुल्कावर आणि दंडाच्या रक्कमेचे जे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत त्या अनुसार मुद्रांक शुल्कासह दंड सवलत देण्यात आली आहे.  ज्या नागरीकांना या अभया योजनेचा लाभ घ्यावायाचा आहे त्यांनी यासंदर्भात या कक्षाशी संपर्क साधावा.


Spread the love

Leave a Comment