Eco Friendly फिरत्या वाहनावरील दुकान E-Vehicle मोफत उपलब्ध करून देणार  

Spread the love

राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही Eco Friendly फिरत्या वाहनावरील दुकान मोफत E Vehicle उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.  

दिव्यांग मोफत वाहन योजनेच्या अटी व शर्ती : Terms and Conditions for Divyang Mofat Vaahan Yojana 2023 

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे अपंग असल्याचे प्रमाणपत्र किमान 40 टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाण असणे गरजेचे आहे व हे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले असावे.
  • अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • अर्जदाराचे वय दि. 01/01/2024 या दिवशी कमीत कमी 18 वर्षे ते 55 वर्षे वयातीलच असणे आवश्यक आहे.
  • मतिमंद अर्जदारांच्या बाबतीत त्यांचे जे पालक असतील ते या योजनेकरिता अर्ज करू शकतील.
  • Divyang Mofat Vaahan Yojana अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रूपयांपेक्षा जास्तीचे नसावे.
  • पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत लाभार्थीची निवड करतांना जास्त अपंगत्व असलेल्या उमेदवारास प्रथम प्राधान्य दिले जाईल त्यामुळे प्राधान्यक्रम हा अतीतीव्र दिव्यांग ते कमी दिव्यांग अशा क्रमात असेल.
  • जर अतीतीव्र दिव्यांगत्व असणा-या उमेदवारास E Vehicle वाहन चालविण्याचा परवाना नाकारला गेला असल्यास अशा स्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतीतीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत दुसरा एखादा इसम घेउन फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
  • अर्जदाराने अर्ज भरण्याचया वेळी सर्व अटी व शर्ती मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र लिहुन देणे आवश्यक असेल.
  • दिव्यांग वाहन योजनेचे लाभार्थी निवड करतांना ती जिल्हानिहाय लाभार्थ्यांच्या दिव्यांगाच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल.
  • अर्जदार हा कोणत्याही शासकीय, निमशासकीय, मंडळे, महामंडळे यांचा कर्मचारी असता कामा नये.
  • Free E Vehicle  या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असला तर तो कर्ज थकबाकीदार नसावा.

ऑनलाईन अर्ज करण्याकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे : Document for Free E Vehicle 

  1. अर्जदाराचा फोटो
  2. अर्जदाराची स्वतःची सही
  3. जातीचा दाखला
  4. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) 
  5. पत्त्याबाबतचा पुरावा (Ration Card or Voter Id or Light Bill Etc.)
  6. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (Disability Certificate)
  7. युडीआयडी प्रमाणपत्र (UDID Certificate)
  8. ओळखपत्र  (Identity Card) (Aadhar Card)
  9. बॅंक पासबुकचे पहिले पान 
  10. अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र 

ऑनलाईन अर्ज करण्याकरिता पुढे काही स्टेप्स दिल्या आहेत त्याप्रमाणे आपण आपला अर्ज भरावा How to fill Environment Friendly Free E Vehicle Form Steps 

  • प्रथम  https://evehicleform.mshfdc.co.in  या अधिकृत संकेतस्थळावर जावे आणि तेथे दिलेले माहितीपत्रक एकदा काळजीपुर्वक व बारकाईने वाचावे म्हणजे आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करतांना कुठलीही अडचण येणार नाही. 
  • त्यानंतर तेथील Register  बटनावर क्लिक करावे.
  • पुढे आपल्याला आपला मोबाईल नंबर विचारला जाईल त्यावर आपण आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्याचा एक ओटीपी मिळेल तो टाकल्यानंतरच आपल्याला पुढील फॉर्म ओपन होणार आहे.
  • आपले एकदा रजिष्ट्रेशन पुर्ण झाल्यानंतर मग एक फॉर्म आपल्यासमोर ओपन होणार आहे.  
  • त्यामधील सर्व माहिती जसे की नांव, वडिलांचे नांव, आडनांव, आईचे नांव, फोटो, सही इ. अचुक भरावे. तसेच ज्या ज्या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी टॅब दिले आहेत त्या ठिकाणी आपण आपले आवश्यक असणारी कागदपत्र अपलोड करणे गरजेचे आहे.  त्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही.
  • खाली त्याबाबत फॉर्मच्या पेजच्या स्टेप बाय स्टेप स्क्रिन शॉट आपल्या माहितीसाठी दिल्या आहेत त्याचे अवलोकन करावे आणि आपला अर्ज यशस्विरित्या सबमिट करावा..
  • mukhyamantri vahan yojana, cm vahan yojana, pradhanmantri vahan yojana.

Step 1 : How to Register :

divyang-mofat-vaahan-yojana-2023-1

Step 2 : How to fill General Information Like Name, Fathers Name, Surname Etc.,

divyang-mofat-vaahan-yojana-2023
divyang-mofat-vaahan-yojana-2023

Step 3 : How to fill Address Details :

divyang-mofat-vaahan-yojana-2023
divyang-mofat-vaahan-yojana-2023

Step 4 : For Fill Disability Details :

divyang-mofat-vaahan-yojana-2023
divyang-mofat-vaahan-yojana-2023-4

Step 5 : For Fill Employment Details :

divyang-mofat-vaahan-yojana-2023
divyang-mofat-vaahan-yojana-2023

Step 6 : For Identity Details :

divyang-mofat-vaahan-yojana-2023
divyang-mofat-vaahan-yojana-2023

Spread the love

Leave a Comment