Central Bank of India मध्ये 10वी पास वर नोकरीची सुवर्णसंधी

Spread the love

Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया मध्ये 484 पदांच्या नोकरीची जाहिरात नुकतीच प्रसिध्द करण्यात आली.  10वी 12वी पास असणा-या उमेदवारांसाठी ही एक नोकरीची चांगली संधी आहे. सरकारी नोकरी फॉर्म कधी सुटतात कधी नाही हे लवकर न कळाल्यामुळे अनेक मुलांना त्याचे फॉर्मही भरता येत नाहीत. त्यामुळे ही भरती एक चांगली संधी आहे. 

Central Bank of India Recruitment 2023 Overview : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया भरतीबाबत आढावा 

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये स्वच्छता कर्मचारी या पदाच्या एकुण 484 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.  ही भरती 10 वी पास उमेदवारांकरिता आहे परंतु जर आपण 12 वी पास असाल तरी आपण याकरिता अर्ज करू शकता. तुम्हाला जर बॅंकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर सेंट्रल बंॅंकेमध्ये निघालेली भरती ही एक चांगली सुवर्णसंधी आहे.  सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने सफाई कर्मचारी अर्थात स्वच्छता कर्मचारी या पदासाठी अर्ज करू इच्छिणा-या सर्व उमेदवार यांना बॅंकेच्या अधिकृत संकेतस्थळ  www.centralbankofindia.co.in  यावर जाउन अर्ज करू शकता.  यासाठी अधिकृत जाहिरातही सोडण्यात आली आहे.  या पदासाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.  

Educational Qualification of Central Bank of India Recruitment 2023

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या स्वच्छता कर्मचारी या पदाकरिता अर्ज करू इच्छिणा-या उमेदवार हा कमीत कमी इयत्ता दहावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.  इयत्ता दहावी त्याने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड असणे आवश्यक आहे.  तसेच उमेदवाराला तेथील स्थानिक भाषेचे ज्ञान असणेही आवश्यक आहे. 

Age Limit :

उमेदवाराचे वयाची मर्यादा दि. 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 च्या दरम्यान असावी याशिवाय सरकारी नियमांनुसार जी वयात सवलत दिली जाते ती ही यामध्ये दिली जाणार आहे.

Fee Payment :

एस.सी., एस.टी., अपंग तसेच महिला उमेदवारांना अर्जाचे शुल्क म्हणुन रूपये 175 व इतर सर्व उमेदवारांना म्हणजेच सर्वसाधारण, ओबीसी, व इतर यांना 850 रूपये भरावे लागणार आहे.

Important Dates :

स्वच्छता कर्मचारी या पदाकरिता अर्ज सुरू होण्याची तारीख ही 20 डिसेंबर 2023 अशी असुन अर्ज सबमिट करण्याची शेवटची मुदत ही 9 जानेवारी 2024 ही असुन त्यापुर्वी या पदाकरिता अर्ज करू शकता.  

How to Apply Online of Central Bank of India Recruitment 2023 :

स्वच्छता कर्मचारी या पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांना खाली दिलेली जाहिरात ही काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे.  त्यानंतरच पुढील अर्ज भरून अर्जाचे शुल्क भरून फॉर्म ऑनलाईन सबमिट करावा.  परीक्षेच्या तारखा या यथावकाश अधिकृत संकेतस्थळावर कळविल्या जाणार आहेत.  भरतीच्या जागेबाबतचा सविस्तर तपशील आपल्याला सर्वात शेवटी दिलेल्या जाहिरातीमध्ये सविस्तर पहावयास मिळणार आहे.  ज्यामध्ये अहमदाबाद, भोपाळ, छत्तीसगड, दिल्ली, राजस्थान, कलकत्ता, लखनउ, पुणे, पटना या जिल्हयांचा समावेश आहे.  

Central Bank of India Detail Advertisement : Please Click Here

सेंट्रल बॅंक ऑफ इिंडया स्वच्छता कर्मचारी पदाच्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा.


Spread the love

Leave a Comment