MPSC syllabus in marathi

Spread the love

येणाऱ्या MPSC परीक्षेमध्ये MPSC Syllabus आणि Exam Pattern मध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत जे या ठिकाणी आम्ही आपल्याला देणार आहोत.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा MPSC ही राज्यातील सर्वात सर्वश्रेष्ठ अशी सरकारी नोकरी आहे.  प्रत्येक वर्षी हजारोच्या संख्येने उमेदवार या परीक्षेसाठी बसतात आणि आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात.  आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून MPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांकारिता पूर्व परीक्षेचा पूर्ण  Syllabus घेऊन आलो आहोत ज्याने आपल्याला परीक्षेची तयारी करण्यासाठी नक्कीच मदत मिळेल.

प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येने उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी तयारी करत आहेत.  त्यातील काही या परीक्षेमध्ये यशस्वी होतात तर काही यशस्वी होत नाहीत त्याकरिता आम्ही आज MPSC परीक्षेच्या अभ्यासाविषयी काही महत्वपूर्ण उपाय घेऊन आलो आहोत.

Required Educational Qualification for MPSC :

  • MPSC देऊ इच्छिणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • MPSC परीक्षा देण्यासाठी वयाची अट कमीत कमी 21 वर्ष ते 40 वर्ष यामध्ये असायला हवे.

Syllabus in Marathi for Preliminery Exam :

सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1

यामध्ये एकूण १०० प्रश्न असून २०० गुण असतात. तसेच त्यासाठी नकारात्मक गुणदान पद्धती २५ टक्के अशा स्वरुपात असते.

MPSC Syllabus In Marathi For Paper I :

राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, महत्वाच्या चालू घडामोडी, भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या भारांशासह, महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, भारत आणि महाराष्ट्र, राज्यशास्त्र व प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी, आर्थिक व सामाजिक विकास, शास्वत विकास, दारिद्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी, पर्यावरण परिस्थिती, जैव विविधता आणि हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न, सामान्य विज्ञान

सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2

यामध्ये एकूण १०० प्रश्न असून २०० गुण असतात. तसेच त्यासाठी नकारात्मक गुणदान पद्धती २५ टक्के अशा स्वरुपात असते.

MPSC Syllabus In Marathi For Paper II :

आकलन, संवाद कौशल्य सह अंतर व्यक्तिगत कौशल्य, तर्कशुद्ध आणि विश्लेषणात्मक क्षमता, निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण, सर्वसाधारण मानसिक क्षमता, अंक आणि त्यांचे संबंध, परिमाणाचा क्रम, मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य 

MPSC Exam Pattern :

  • MPSC ची परीक्षा ही 2 स्टेप मध्ये होते त्यातील पहिल्या स्टेप मध्ये पूर्व परीक्षा असते ज्यात दोन पेपर असतात.  
  • पेपर एक सामान्य अध्ययनाचा असतो ज्यात इतिहास, भारत आणि जगाचा भूगोल, भारताची राज्य व्यवस्था, पर्यावरण, जैव विविधता आणि हवामान, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी च्या काही मुद्द्यावर प्रश्न विचारले जातात. पेपर एक २०० गुणांसाठी असतो.
  • पेपर दोन CSAT हा महत्वाचा असून ज्यामध्ये उमेदवाराची तर्कशुद्ध, मेंटल ability, सर्वसाधारण मानसिक क्षमता हे पाहिले जातात.  पेपर क्रमाक एक व पेपर क्रमाक दोन हे दोन्ही  पेपर बहुपर्यायी वस्तूनिष्ठ स्वरुपात  असतात.  तसेच या पेपर साठी Decision Making & Problem Solving  वरील प्रश्न सोडून राहिलेल्या प्रश्नांकारिता नकारात्मक गुणदान (Negative Marking System) असते.
  • या परीक्षेमध्ये उमेदवारांची गुणवत्ता पेपर एक च्या आधारावर तयार होते परंतु पेपर क्रमांक दोन हा अर्हताकारी पेपर असतो ज्यामध्ये उमेदवारांना कमीत कमी 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक असते. या पेपर मध्ये 33 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक एक मधील गुणांच्या आधारे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाते. 

MPSC Syllabus PDF :

For MPSC Syllabus PDF File : Please Click Here

How to Prepare for MPSC Exam :

  • MPSC परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवाराला सामान्य अध्ययन याची प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे.  याकरिता उमेदवाराला इयत्ता 5 वी ते 12 वी NCERT ची पुस्तके वाचणे गरजेचे आहे.  करण या द्वारे आपली प्राथमिक तयारी होईल.  हि NCERT ची पुस्तके आपण online सुद्धा वाचू शकता.  
  • जर तुम्हाला हि पुस्तके तुम्हाला offline वाचायची असतील तर साधारणपणे 3 ते 4 महिन्याच्या कालावधीत ते वाचून पूर्ण करू शकता आणि नंतर वेळेनुसार त्याची रिव्हिजन ही करू शकता. जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावी याकरिता वाचतानाच महत्वपूर्ण topic काढणे आवश्यक आहे.
  • MPSC पूर्व परीक्षेचा अभ्यास करतानाच मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीनही परीक्षांचे उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला परीक्षेची तयारी करायला हवी.

 

 

 

 


Spread the love

Leave a Comment